जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाळीव कुत्रा घरात घुसल्याचा जाब विचारल्याने महिलेला बेदम मारहाण करीत शिवीगाळ केल्याची घटना रामेश्वर कॉलनीत घडली. एमआयडीसी पोलिसात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातील शांतीनगरात सुलोचना जगदिश चव्हाण (वय-२९) या महिला वास्तव्यास आहे. याच परिसरातील हिम्मत पवार (पुर्ण नाव माहित नाही) यांनी पाळलेला कुत्रा शनिवारी ९ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता सुलोचना यांच्या घरात घुसला. त्याचा जाब विचारल्याचा राग आल्याने हिम्मत पवार याने महिलेला शिविगाळ करीत त्यांना चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. मारहाण करीत असतांना त्यांनी महिलेला रस्त्यावर ढकलून दिल्याने त्यांच्या हाताला दुखापत झाली असून त्या जखमी झाल्या आहे. त्यांनी तात्काळ एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार हिम्मत पवार यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री ८ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महेंद्र पाटील हे करीत आहे.