Home क्राईम महिलेसह नातेवाईकांना दारूच्या नशेत दोघांकडून मारहाण

महिलेसह नातेवाईकांना दारूच्या नशेत दोघांकडून मारहाण


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात दारूच्या नशेत येऊन काही कारण नसताना एका महिलेला आणि तिच्या नातेवाईकांना शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिल्याची घटना बुधवार १६ एप्रिल रोजी रात्री १२.३० वाजता घडली आहे. या संदर्भात मध्यरात्री १ वाजता दोन जणांविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, संगीता सुरेश सूर्यवंशी (वय-४०, रा. रामेश्वर कॉलनी जळगाव) या महिला जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको परिसरामध्ये कामाच्या निमित्ताने १६ एप्रिल रोजी नातेवाईकांकडे आलेल्या होत्या. त्यावेळी रात्री १२.३० वाजता संशयित आरोपी असलम शेख आणि फातिमा खान (पूर्ण नाव माहित नाही) दोन्ही रा. पिंप्राळा हुडको या दोघांनी दारूच्या नशेत येऊन संगीता सूर्यवंशी आणि त्यांची नातेवाईकांना मारहाण करून शिवीगाळ केली तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली. दरम्यान या संदर्भात संगीता सूर्यवंशी यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार संशयित आरोपी असलम शेख आणि फातिमा खान या दोघांवर रामानंदनगर पोलीस ठाण्यात अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र राठोड हे करीत आहे.


Protected Content

Play sound