Home क्राईम किरकोळ कारणावरून महिलेला शिवीगाळ व जीवेठार मारण्याची धमकी

किरकोळ कारणावरून महिलेला शिवीगाळ व जीवेठार मारण्याची धमकी

0
176


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील भारत नगरातील आराध्या अपार्टमेंट येथे कंपाऊंडच्या वादाच्या कारणावरून एका महिलेला शिवीगाळ करत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना बुधवारी ६ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. याबाबत दुपारी २ वाजता जळगावशहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, नयन अंकूश कोळी वय ३४ रा. भारत नगर, जळगाव या महिला आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. त्या राहत असलेल्या घराच्या वालकंपाऊंड वरून शेजारी राहणारे समिर खान रूस्तम खान, समीर खान याची आई, वडील आणि अब्बु नावाचा व्यक्ती यांनी नयन कोळी यांना शिवीगाळ करत जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर महिलेने शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिवीगाळ करणारे समिर खान रूस्तम खान, समीर खान याची आई, वडील आणि अब्बु नावाचा व्यक्ती सर्व राहणार भारत नगर, जळगाव यांच्य विरोधात शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ जितेंद्र तावडे हे करीत आहे.


Protected Content

Play sound