Home राजकीय एकनिष्ठा हीच खरी गुरुदक्षिणा : राऊतांचा टोला

एकनिष्ठा हीच खरी गुरुदक्षिणा : राऊतांचा टोला

0
28

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राचेच नव्हे तर भारताचे गुरू होते, असे नमूद करत एकनिष्ठा हीच खरी गुरूदक्षीणा असते असे प्रतिपादन खासदार संजय राऊत यांनी केले. या माध्यमातून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला मारला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने ट्विट केले आहे. आपल्या ट्वीटमध्ये एकनाथ शिंदे यांनी नमूद केले आहे की, बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच. विझणार कधीच अंगार नाही, हिंदुत्वाशिवाय विचार नाही. गुरुपौर्णिमेनिमित्त विनम्र अभिवादन. याबरोबरच त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोटोही शेअर केला आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी ट्विट केल्यानंतर शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना यावर भाष्य केले. ते म्हणाले की, बाळासाहेब हे महाराष्ट्राचेच नव्हे तर भारताचे गुरू होते. लक्षावधी शिवसैनिकांसाठी ते आजही गुरू आहेत. आता काही जण शिवसेनेच्या बाहेर पडून आपण शिष्य असल्याचा दावा करत असून आज बाळासाहेब असते तर त्यांनी खास ठाकरी शैलीत समाचार घेतला असता असे राऊत म्हणाले. तसेच एकनिष्ठा हीच खरी गुरूदक्षीणा असते असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला मारला.


Protected Content

Play sound