चाळीसगाव (प्रतिनिधी) परिवर्तन घडविण्याची, नवे काहीतरी निर्माण करण्याची धमक तरुणांमध्येच आहे. तरुणांच्या शक्तीवर व सर्जनशीलतेवर माझा विश्वास आहे. त्यासाठी तरुणांनी व्यसनाची संगत न करता खेळाची संगत करावी. असे आवाहन युवा नेते मंगेश चव्हाण यांनी आज(दि.२१) येथे केले.
येथील य.ना. चव्हाण महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमादरम्यान त्यांनी मैदानावर स्टार हँडबॉल क्लबच्या हँडबॉल खेळणाऱ्या खेळाडूंची भेट घेतली. भेटीदरम्यान हँडबॉलसाठी पुरेसे साहित्य उपलब्ध नसल्याची खंत खेळाडूंनी व्यक्त करताच त्यांनी लागलीच पुढील आठवड्यात संपूर्ण साहित्य उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. तसेच प्रभाकर भाऊ चौधरी यांनीही पाच हजार रुपयांची मदत साहित्य खरेदीसाठी जाहीर केली.
या प्रसंगी प्रभाकर चौधरी, परेश पवार (प्रशिक्षक), कल्पेश चौधरी(राज्यस्तरीय खेळाडू), प्रफुल्ल शेळके (आन्तरराष्ट्रीय खेळाडू), करण राजपूत (क्रीडा शिक्षक), निलेश राजपूत (राज्यस्तरीय पदकप्राप्त खेळाडू), अभिजीत अहिरराव (पोलीस कर्मचारी)
आदी उपस्थित होते.