तहसीलदाराच्या लेखी आश्वासनाने शिवप्रेमी योगराज चंद्रकांत लोहारांचे उपोषण स्थगित

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | २५ जून रोजी पारोळा तहसील कार्यालय समोर शिवप्रेमी सेना संस्थापक अध्यक्ष योगराज चंद्रकांत लोहार, गनेश पारधी, नितीन महाजन, समाधान पाटील, चेतन पाटील, रोहित पाटील, धिरज महाराज, लकी गोधळी, अजय ठाकरे इत्यादि कार्यकर्ता व पदाधिकारी उपोषणास बसले होते. उपोषणाची प्रमुख मागणी छत्रपती शिवाजी महाराज यांचे महाराष्ट्रातील गड किल्ले निसर्गाच्या प्रकोपाने दिवसे न दिवस खराब व जिर्न होत चालले आहेत व काही भाग तुटलेल्या अवस्थेत आहेत.

या सर्व बाबीची शासनाने व संबंधित पुरातत्व विभागाने तात्काळ लक्ष वेधुन पुनरा जीवन म्हनुन गड किल्ले दुरुस्ती बांध काम तथा साफसफाई मोहिम राबवीन्यात यावी या साठी उपोषण होत होते परंतु २६ जून रोजी पदवीधर मतदार संघ निवडणूक प्रक्रिया मुळे तहसील आवारात उपोषणे आंदोलने करता येत नाही. त्यामुळे संबंधित विभागाला निवेदनाच्या जिल्हाधिकारी कार्यालय व पुरातत्व विभाग नाशिक पाठविण्यात आले आहे. त्यानंतर पारोळा तहसील तर्फे लेखी आश्वासना दिले आहे. नायब तहसीलदार निवडणूक शाखा शांताराम पाटील व फौजदारी दंड टेबल कारकुन वारकर भाऊसाहेब, पुरवठा निरीक्षक गिरासे भाऊ साहेब, रिपब्लिकन पार्टी ऑफ़ इंडिया आठवले गटाचे शहर अध्यक्ष राहुल केदार देखिल उपस्थित होते.

Protected Content