जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या पुढाकाराने तब्बल चार हजार शेततळ्यांच्या मदतीने सिंचनाची व्यवस्था असणारी प्रणाली उभारण्यात येत असून याच्या कामाला आता वेग आला आहे.
ना. गिरीशभाऊ महाजन यांच्या प्रयत्नांनी वाघूर उपसा सिंचन क्रमांक-1 अंतर्गत जामनेर तालुक्यात तब्बल चार हजार शेततळ्यांची निर्मिती करण्यात येत आहे. यातून सुमारे 29,655 हेक्टर जमीन ही सिंचना खाली येणार आहे. या योजनेचे काम अतिशय वेगाने सुरू असून आज ना. गिरीश महाजन यांनी जिल्हाधिकारी, मुख्य अभियंता गोकूळ महाजन तसेच अन्य अधिकाऱ्यांसोबत याची पाहणी केली.
शेततळ्यांच्या मदतीने जामनेर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना शाश्वत जलसाठा उपलब्ध होणार असून यामुळे त्यांच्या उत्पन्नात भर पडणार आहे. एकूणच या प्रकल्पामुळे जामनेर तालुक्याचा कायापालट होणार आहे. आज ना. गिरीश महाजन यांनी कामाची पाहणी केल्यानंतर आवश्यक त्या सूचना देत विहित कालावधीत काम पूर्ण करण्याचे निर्देश दिलेत.