शिवसैनिक मातोश्रीचा आदेश पाळणार की नाही ?- खा. खडसे


रावेर (प्रतिनिधी) आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना माझ्यासाठी प्रचाराचे काम करायचे आहे किंवा नाही, ते त्यांनी ठरवावे, हा त्यांच्या इच्छेचा भाग आहे. पण नुकतीच भाजपा सेनेची युती झाली असताना सेनेचे जिल्ह्यातील पदाधिकारी मातोश्रीचा आदेशही डावलणार का ? असा प्रश्न खासदार रक्षा खडसे यांनी शिवसैनिकांना केला आहे.

खडसे परिवारातील उमेदवार असल्यास आम्ही त्यांचा प्रचार करणार नाही, असे शिवसेनेने नुकतेच भुसावळ येथे पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले होते. त्यानंतर राज्यात भाजप व शिवसेनेची युती करण्याचा निर्णय झाला आहे. आगामी निवडणुकांचे पडघम दोन्ही पक्षांचे नेते वाजवीत असताना भाजपच्या विद्यमान खासदार रक्षाताई खडसे यांनी मत व्यक्त केले आहे. शिवसेनेचे लोक सोबत आले तर त्यांना घेऊन अन्यथा त्यांच्याशिवाय आपण लढण्यास सक्षम असल्याचा सूचक इशाराच त्यांनी देऊन टाकला आहे. त्या आज व्ही एस नाईक कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना निबंध स्पर्धेच्या मार्गदर्शनासाठी आल्या होत्या, यावेळी पत्रकारांनी जिल्हातील शिवसेना पदाधिकारी लोकसभा निवडणुकीत आपला प्रचार करणार की नाही ? असे विचारले असता त्यांनी वरीलप्रमाणे मत व्यक्त केले. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, अॅड. प्रवीण पाचपोहे हे त्यांच्यासोबत होते.

Add Comment

Protected Content