Home क्राईम पुण्यात पतीनेच केला पत्नीचा खून

पुण्यात पतीनेच केला पत्नीचा खून

0
52

chaku halla

पुणे प्रतिनिधी । घरोघरी जाऊन धुण्या भांड्याची कामे करणारी पत्नी कामावरून उशिरा घरी येते म्हणून पतीने तिचा गळा चिरून खून केल्याची घटना आज (दि.२३) सकाळी घडली आहे. शहरातील पिंपळे गुरव येथे ही घटना घडली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शैला हनुमंत लोखंडे (वय-४०) असे मृत महिलेचे नाव आहे. तर हनुमंत बाबुराव लोखंडे (वय-५८, रा. वैदुवस्ती, पिंपळे गुरव) असे माहिलेच्या पतीचे नाव आहे. आज पहाटे चार वाजेच्या सुमारास त्या दोघांमध्ये भांडण सुरू होते. यावेळी संतापलेल्या आरोपीने शैला यांच्यावर कोयत्याने वार केला. त्यांचा आरडा ओरडा ऐकून वरच्या मजल्यावर राहणारा सावत्र मुलगा खाली आला. त्याने खिडकीची काच फोडून घरात प्रवेश केला. त्यावेळी शैला या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. मुलाने त्वरित पोलिस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पतीला ताब्यात घेतले. पुढील तपास सांगवी पोलिस करीत आहेत.


Protected Content

Play sound