मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकीकडे शिवसेनेत उभी फूट पडून राज्यात सत्तांतर झाले असतांना पक्षावरील आणि विशेष करून धनुष्यबाण चिन्हावरील मालकीचे भविष्य न्यायालयात ठरणार आहे. अशातच पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आपल्या मनोगतातून नवीन चिन्ह मिळाल्यास यासाठी कार्यकर्त्यांनी तयार रहावे असे आवाहन केले आहे.
ॠसविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचा
शिवसेनेच्या मालकीवरूनचा वाद आता सुप्रीम कोर्टात पोहचला असून तेथेच या पक्षाचे भविष्य ठरणार आहे. मात्र याआधीच उध्दव ठाकरे यांनी निकाल विरोधात गेल्यास पुढे काय करायचे याचा विचार करून ठेवल्याची माहिती समोर आली असून या संदर्भात टिव्ही नाईन या वाहिनीने वृत्त दिले आहे.
या वृत्तानुसार, न्यायालयीन लढाईत शिवसेनेच्या मालकीसोबत पक्षाचे चिन्ह असणार्या धनुष्यबाणाबाबत निकाल लागू शकतो. यात निकाल विरूध्द गेल्यास काय करायचे याची तयारी उध्दव ठाकरे यांनी केल्याचे आता स्पष्ट झाले आहे. यात विशेष करून न्यायालयाने जर पक्षाचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठविले, तर मग नवीन चिन्ह मिळून ते जनतेपर्यंत पोहचवण्याची जबाबदारी ठाकरे यांच्या समर्थकांना करावी लागणार आहे. याचमुळे त्यांनी नवीन चिन्ह मिळाल्यास ते राज्यभरात पोहचवण्यासाठी तत्पर राहण्याचे आवाहन केले आहे.