Home Cities जळगाव कोण आहेत जळगावचे नवीन जिल्हाधिकारी रोहन घुगे ?

कोण आहेत जळगावचे नवीन जिल्हाधिकारी रोहन घुगे ?

0
703


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगावच्या जिल्हाधिकारीपदी आयएएस अधिकारी रोहन घुगे यांची नियुक्ती करण्यात आली असून ते लवकरच जिल्हाधिकारीपदाची सूत्रे हाती घेणार आहेत. त्यांनी आजवरच्या अल्प कार्यकाळात आपल्या कामाची चमक दाखवून दिली आहे.

जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची आज बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी रोहन घुगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज सायंकाळी याबाबतचे आदेश निर्गमीत करण्यात आले आहेत. घुगे हे 2018 सालच्या आयएएस बॅचचे अधिकारी असून ते सध्या ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. जाणून घ्या त्यांची आजवरची कारकिर्द !

रोहन बापूराव घुगे हे मूळचे नांदेड जिल्ह्यातील रहिवासी असून त्यांचे वडील एसबीआयमध्ये कार्यरत होते. त्यांनी प्राथमिक शिक्षण मराठी शाळेतून पुर्ण केले. यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठातून बी.टेक. पदवी संपादन केली. यानंतर ते खासगी कंपनीत रूजू झाले. ते लंडन येथे अभियंता म्हणून कार्यरत झाले. तथापि, विदेशात काम करत असतांना देखील त्यांना स्पर्धा परिक्षेचे क्षेत्र खुणावू लागले.

यानंतर त्यांनी स्पर्धा परिक्षांची तयारी केली. पहिल्यांदा 2015 साली असिस्टंट कमांडंट म्हणून त्यांची निवड करण्यात आली. पुढील वर्षी म्हणजेच 2016 साली त्यांची भारतीय वन सेवा अर्थात आयएफएस म्हणून नियुक्ती झाली. तर पुढील वर्षी त्यांनी युपीएससीच्या नागरी सेवा परिक्षेत यश संपादन करून आयएएस रँक संपादन केली.

प्रारंभी रोहन घुगे यांनी प्रशिक्षणार्थी म्हणून कार्य केल्यानंतर त्यांनी वर्धा आणि नंतर ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले. या पदावर काम करतांना त्यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी ‘मिशन दीपस्तंभ’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला. यासाठी त्यांना राष्ट्रीय पातळीवरील पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

वर्धा जिल्हा कुपोषण मुक्त व्हावा यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. तर अलीकडेच राज्य सरकारच्या शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमात ठाणे जिल्हा अग्रक्रमावर राहिल्याने त्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विशेष गौरव देखील करण्यात आला. तर ठाणे जिल्ह्यातच त्यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘दिशा’ हा उपक्रम राबविला असून याचे देखील मोठ्या पातळीवर कौतुक झाले आहे. आता ते जळगावचे जिल्हाधिकारी म्हणून रूजू होत आहेत.


Protected Content

Play sound