राष्ट्रवादीमध्ये ‘व्हीप युध्द’ : अनिल पाटील व जितेंद्र आव्हाडांचे स्वतंत्र पक्षादेश !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आजपासून पावसाळी अधिवेशन सुरू होत असतांना राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये व्हीप युध्द सुरू झाले असून याची परिणीती कायदेशीर पेचात होण्याची शक्यता आहे.

आजपासून विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. याआधी अजित पवार यांचा गट सत्ताधार्‍यांना जाऊन मिळाल्याने विरोधक कमकुवत झाले आहेत. सत्ताधार्‍यांना तब्बल २०० पेक्षा जास्त सदस्यांचे पाठबळ लाभल्याने सरकार मजबूत झाले आहे. तर विरोधक मोठ्या प्रमाणात कमकुवत दिसून येत आहेत. या आधीच राष्ट्रवादीत एका नव्या विषयावरून संघर्ष निर्माण होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

शरद पवार गटाचे प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांसाठी व्हीप काढत त्यांना विरोधी बाकांवर बसण्याचे निर्देश दिले आहेत. तर अजितदादा पवार गटाचे प्रतोद अनिल भाईदास पाटील यांनी याच्या नेमक्या विरूध्द व्हीप काढला आहे. यामुळे आता नेमका कुणाचा व्हीप चालणार ? आणि याचे उल्लंघन केल्यास कुणावर कारवाई होणार ? याबाबत संभ्रमाची अवस्था निर्माण झाली आहे. तर, यावरून निर्माण झालेला वाद हा न्यायालयात जाण्याची शक्यता देखील आहे.

Protected Content