Home Cities जामनेर जामनेर पंचायत समितीच्या सभापतीपदी सुनंदा पाटील

जामनेर पंचायत समितीच्या सभापतीपदी सुनंदा पाटील

0
42

WhatsApp Image 2020 01 02 at 8.10.14 PM

जामनेर, प्रतिनिधी | पंचायत समितीच्या सभापतीपदी सूनंदा प्रल्हाद पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.  त्या वाघारी गणाचे प्रतिनिधित्व करतात.

पंचायत समिती ही भाजपच्या ताब्यात असून भाजपाचे स्पष्ट बहुमत असल्याने या ठिकाणी सर्वांना समान संधी माजी मंत्री गिरीष महाजन यांच्या माध्यमातून दिली जात आहे. या आधी नुकतीच निता कमलाकर पाटील यांना संधी देण्यात आली होती आणि आता वाघारी गणातून निवडून आलेल्या सूनंदा प्रल्हाद पाटील या सभापतीपदी विराजमान झाल्या आहेत. आज २ जानेवारी रोजी त्यांची अधिकृत निवड झाली. प्रल्हाद पाटील हे भाजपाचे जुने कार्यकर्ते असून त्यांच्या पत्नी सुनंदा पाटील देखील या सक्रीय राजकारणात सहभागी असून हे पाटील दाम्पत्य भाऊंचे निकटवर्तीय मानले जाते. आणि जनमानसात चांगली प्रतिमा असलेले सुनंदा पाटील यांची सभापतीपदी वर्णी लागली असल्याने वाघारी गणात एक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे आणि गिरीश महाजन हे नेहमीच तालुक्यातील प्रत्येक कार्यकर्त्याला योग्य वेळेला योग्य संधी देतात हे या निवडीवरून दिसून येत आहे.


Protected Content

Play sound