जळगाव (प्रतिनिधी) येथील आरटीओ कार्यालयाच्या आवारात जप्त केलेल्या वाहनातून लोखंडी जॅक चोरतांना दोन चोरट्यांना आज (रविवार) दुपारी सुरक्षा रक्षकाने रंगेहाथ पकडले आहे.
या संदर्भात अधिक असे की, आज दुपारी प्रकाशसिंग मितसिंग बावरी (वय २८) व हिंमतसिंग चरणसिंग बावरी (वय ३०, दोघे रा.तांबापुर) हे दोघं आरटीओ कार्यालयात जप्त करुन ठेवलेल्या (एमएच १९ एस ५९६८) क्रमांकाच्या वाहनातून लोखंडी जॅक चोरी करत होते. यावेळी पहारेकरी पुरूषोत्तम हिरालाल दुबे (वय ५४, रा.समतानगर) यांच्या लक्षात ही गोष्ट लक्षात आली. त्यांनी दोघांना हटकत पटकन रामानंदनगर पोलिसांना बोलावून दोघांना त्यांच्या ताब्यात दिले. या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.