कारण नसतांना चौघांकडून तरूणाला बेदम मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । काहीएक कारण नसताना चौघांनी तरुणाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. याबाबत सोमवारी ६ जून रोजी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुका पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नितीन उर्फ बबलू प्रेमराज सोनवणे (वय-३०) रा. नांद्रा बुद्रुक ता.जि. जळगाव हा तरुण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतो. रविवार ५ जून रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास नितीन सोनवणे हा त्याच्या घरी बसलेला असताना अंगणात गावातील नागेश्वर पाटील हा दारू पिऊन  शिवीगाळ करत होता. शिवीगाळ का करत आहे, असे नितीनची आत्या व काका यांनी विचारला. याचा राग आल्याने राजेश अर्जुन पाटील, गोपाल राजेश पाटील, गुरुप्रसाद प्रकाश पाटील, नागेश्वर अरुण पाटील सर्व रा. नांद्रा बु. ता. जळगाव यांनी लाकडी दांडक्याने नितीनला बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. आणि कुर्‍हाडीने मारून टाकेल अशी धमकी दिली. त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

याप्रकरणी नितीन उर्फ बबलू सोनवणे यांच्या फिर्यादीवरून सोमवारी ६ जून रोजी दुपारी १ वाजता संशयित आरोपी राजेश अर्जुन पाटील, गोपाल राजेश पाटील, गुरुप्रसाद प्रकाश पाटील आणि नागेश्वर अरुण पाटील यांच्या विरोधात जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक संदीप पाटील करीत आहे.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!