Home क्राईम गेम खेळतांना मोबाईलचा स्फोट; गोलाणी मार्केटमधील घटना

गेम खेळतांना मोबाईलचा स्फोट; गोलाणी मार्केटमधील घटना


Mobile blast

जळगाव प्रतिनिधी । मोबाईलवर चॉटिंग करत असतांना मोबाईलमधून अचानकपणे धुर निघत स्फोट झाल्याची घटना आज दुपारी शहरातील गोलाणी मार्केटमध्ये घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी नगरात राहणारे मुर्तजा बोहरी एरंडोलवाला (वय-42) यांचे गोलाणी मार्केटमध्ये मोबाईल सेल आणि रिपेअरिंगचे जोगेश्वरी नावाचे दुकान आहे. आज दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास ते त्यांच्या एमआय 04 कंपनीचा मोबाईलवर गेम व चॅटिंग करत असतांना अचानकपणे धुर निघाला. मोबाईलमधून धुर निघत असल्याचे पाहून त्यांनी तातडीने मोबाईल दुकानाच्या बाहेर फेकला. त्यावेळी मोबाईलमधून फटाक्याचा आवाज येऊ लागला. थोड्यावेळानंतर त्याच्यावर पाणी टाकून विझविण्यात आला होता. यात कोणलाही दुखपत झाली नाही अशी माहिती मुद्दसर अहमद यांनी दिली. याबाबत घटनेबाबत अद्याप पोलीसात नोंद करण्यात आलेली नाही.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound