काय सांगता ? : आता पतंजलीचे क्रेडीट कार्डही मिळणार

मुंबई- लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पतंजलीच्या माध्यमातून नवनवीन प्रॉडक्ट आणि सेवा सुरू करण्याचा सपाटा लावल्यानंतर आता बाबा रामदेव यांनी क्रेडीट कार्ड देखील लॉंच केले आहे.

पतंजलीच्या माध्यमातून विविध हेल्थ प्रॉडक्ट लोकप्रिय झाल्यानंतर आता बाबा रामदेव यांनी आपल्या व्यवसायात वैविध्य आणण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू केल्याचे दिसून येत आहे. या अनुषंगाने  पतंजलीने आता स्वतःचे क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहे. ही क्रेडिट कार्डे पंजाब नॅशनल बँक   आणि   पतंजली आयुर्वेद लिमिटेड  यांनी संयुक्तपणे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या भागीदारीसह लॉन्च केली आहेत.

कार्ड लॉंच झाल्यापासून तीन महिन्यांपर्यंत, कार्डधारकांना पतंजली स्टोअरमध्ये २५०० रुपयांवरच्या खरेदीवर ५० रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळणार आहे. दोन्ही को-ब्रँडेड कार्ड्स पतंजली उत्पादने खरेदी करण्यासाठी क्रेडिट सेवा देतात तसेच कॅश बॅक, लॉयल्टी पॉइंट्स, विमा संरक्षण आणि इतर काही वैशिष्ट्ये आहेत. यात प्लॅटिनम आणि सिलेक्ट कार्डांना अपघाती मृत्यू आणि वैयक्तिक एकूण अपंगत्वासाठी अनुक्रमे रु. २ लाख आणि रु. १० लाखांचे विमा संरक्षण मिळेल. प्लॅटिनम क्रेडिट कार्डवर २५,००० ते ५ लाख रुपयांची क्रेडिट मर्यादा उपलब्ध असेल. यातील सिलेक्ट कार्डवर ५०,००० ते १० लाख रुपयांची क्रेडिट मर्यादा उपलब्ध असेल. प्लॅटिनम कार्डवर शून्य जॉइनिंग फी असेल. मात्र, ५०० रुपये वार्षिक शुल्क असेल. त्याच वेळी, सिलेक्ट कार्डवर ५०० रुपये जॉइनिंग फी आणि ७५० रुपये वार्षिक शुल्क असेल असे जाहीर करण्यात आले आहे.

 

Protected Content