Home क्राईम लग्नाला गेले अन् घर फोडले ; चोरट्यांनी लांबविला ९० हजारांचा ऐवज !

लग्नाला गेले अन् घर फोडले ; चोरट्यांनी लांबविला ९० हजारांचा ऐवज !


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर शहरात चोरीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह चांदीचे दागिने असा एकूण ९० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर येथील बेलदार वाडा परिसरात राहणारे गणेश शंकर बेलदार हे आपल्या कुटुंबासह २८ एप्रिल रोजी सायंकाळी एका लग्नकार्यासाठी बाहेर गेले होते. अक्कडसासू यांच्या मुलाच्या लग्नानिमित्त मांडव कार्यक्रमाला गेलेले असताना, घराला कुलूप असल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी संधी साधली. सायंकाळी ५ ते रात्री ११ वाजेच्या सुमारास चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.

घरातील लोखंडी पेटीचा कडा तोडून चोरट्यांनी त्यातील ८० हजार रुपये रोख रक्कम चोरली. यामध्ये ५००, २०० आणि १०० रुपयांच्या नोटांचा समावेश होता. रोख रकमेसोबतच चोरट्यांनी १० हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने, ज्यात चार भार वजनाचे तोरड्या आणि दोन भार वजनाची चांदीची अंगठी व जोडवे असा ऐवज चोरून नेला. रात्री उशिरा गणेश बेलदार घरी परतले असता, त्यांना घराचे कुलूप तुटलेले दिसले आणि घरात चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी गणेश बेलदार यांच्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound