भुसावळ प्रतिनिधी । दिपनगर वीज केंद्रात नव्यानेच रूजू झालेले मुख्य अभियंता विजय राठोड यांची संयुक्तपणे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन व राष्ट्रवादी काँग्रेस ट्रेड युनियन या दोन संघटनांनी भेट देवुन त्याचे पुष्पगुच्छ देवुन स्वागत केले आहे.
याप्रसंगी कामगारांच्या प्रश्नाला प्राधान्य देवु, असे शिष्टमंडळाला सांगितले.विज निर्मितीसाठी युनियन नेहमी आपल्याला सहकार्य करेल, असे आश्वासन संघटना प्रतिनिधींनी यावेळी मुख्य अभियंता राठोड यांना दिले आहे. यावेळी त्यांना महानिर्मिती अत्यंत आर्थिक अडचणीत असल्याने अवाजवी खर्च होणार नाही, या बाबत दक्षता घ्यावी, अशा आशयाचे निवेदनही देण्यात आले,
यावेळी कामगार नेते अरुण दामोदर, कें.पदाधिकारी जितेंद्र वराडे, झोनल सचिव भरत पाटील, शाखा अध्यक्ष तेजराव नाईक, शाखा सचिव अनिकेत नवले, जावेद खान, प्रविण तायडे, माऊली चौरे, संजय झांबरे, कृष्णा बऱ्हाटे, शेनफळ चौथे, संजय तायडे हे उपस्थित होते.