Home Cities जळगाव नेपाळ बस अपघातातील मृतदेह जळगाव विमानतळावर दाखल

नेपाळ बस अपघातातील मृतदेह जळगाव विमानतळावर दाखल

0
111

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज । नेपाळ येतील बस अपघातात मयत झालेल्या २५ जणांचे मृतदेह आज रात्री विशेष विमानाने दाखल झाले आहेत.

आज सकाळी काठमांडू येथून २५ मृतदेह घेऊन विशेष विमान निघाले होते. या दुर्घटनेतील 25 जणांचे मृतदेह आज जळगाव विमानतळावर वायुदलाच्या विशेष विमानाने आणले. संपूर्ण शासकीय प्रक्रिया पूर्ण करून नातेवाईकांना सुपूर्द केले. या मृतदेहांवर आज रात्री अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री रक्षाताई खडसे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, आ. सुरेश ( राजूमामा ) भोळे आ. संजय सावकारे,आ. मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, कस्टम विभागाचे अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील, संबंधित अधिकारी, उपस्थित होते.


Protected Content

Play sound