पाचोरा (प्रतिनिधी) जळगाव लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार उन्मेष पाटील मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्यानंतर त्यांचे पाचोरा येथे ढोल ताश्यांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत करण्यात आले.
पाचोरा येथे ढोल ताश्यांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजी करत खा. पाटील यांनी नम्रपणे स्वागत स्वीकारले. यानंतर त्यांनी पंडितराव शिंदे व कृ.उ.बा. समिती पाचोरा-भडगावचे सभापती सतीश शिंदे यांचा आशीर्वाद घेतला. यावेळी नगरसेविका सिंधुताई शिंदे यांनी त्यांचे औक्षण करून त्यांना आशीर्वाद दिला. त्यावेळी उपस्थित भाजपा युवानेते अमोल शिंदे, रुपेश शिंदे तसेच नगरसेवक अॅड. योगेश पाटील, निरजदादा जैन ,विष्णु अहिरे, रफिक बागवान, लतीफ खान, डॉ.जीवन पाटील,मुस्लिम शेठ बागवान विस्तारक विक्की देशमुख आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.