विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात शेकडो रुग्णांवर मोफत उपचार

3a7649aa 8ce6 4d42 8465 8304eb545480

 

पाचोरा (प्रतिनिधी) येथील विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत शेकडो रुग्णांवर मोफत उपचार झाले आहेत. यामुळे डॉ.भूषण मगर व डॉ.सागर गरुड यांनी समाजसेवक म्हणून आपला ठसा सर्वसामान्य नागरिक व गोरगरिबांमध्ये निर्माण केला आहे.

 

राज्यातील गोरगरिबांना मोठ्या आरोग्याच्या उपचारासाठी आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने मोठमोठ्या आजारांवर ऑपरेशन करणे शक्य नसल्याने महाराष्ट्र शासनाने २०१२ पासून राजीव गांधी जीवनदायी योजना ही योजना राज्यव्यापी केली होती. दिनांक १३ एप्रिल २०१७ च्या शासन निर्णयान्वये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना या नावाने सुरु ठेवण्यास मान्यता देण्यात आली. या योजनेत लाभार्थी: अन्न नागरी पुरवठा विभागाकडून वितरीत करण्यात आलेल्या पिवळ्या,अंत्योदय अन्न योजना अन्नपूर्णा योजना व केशरी ( रु. १ लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न ) शिधापत्रिका धारक कुटुंबे तसेच नाशिक औरंगाबाद धुळे नंदुरबार जळगाव या विभागातील शेतकरी अवर्षणग्रस्त जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रिका शेतकरी कुटुंबे या योजनेचे लाभार्थी आहेत.

 

या योजनेसाठी पाच जिल्हातील जळगाव जिल्ह्यात पाचोरा येथील डॉ भूषण मगर यांचे विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे ही योजना सुरू झाली आहे. राज्यातील सर्व सामान्य नागरिक व गोरगरिबांना नको त्या आजारापासून मुक्त होण्यासाठी या योजनेचा लाभ मिळणार आहे. पाचोरा विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आरोग्य मित्र उपलब्ध आहेत. आरोग्यमित्र रुग्णाची योजनेंतर्गत ऑनलाईन नोंदणी करतात. तसेच रुग्णालयात उपचार घेतांना योग्य ते सहाय व मदत करतात. रुग्णांची नोंदणी आरोग्य मित्रामार्फत केली जाते. रुग्ण नोंदणीच्या वेळी रुग्णाच्या नावाची पडताळणी त्याचे ओळखपत्र पाहून केली जाते. ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरल्या जाणाऱ्या कागद पत्रांची यादी त्याच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

 

या प्रकीयेमध्ये उपचारांसाठी मान्यता देण्यासाठी संगणकप्रणालीवर कागदपत्रांची पडताळणी केली जाते. पॅकेजनिहाय आवश्यक कागदपत्रांची यादी संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मान्यता नाकारण्यात आलेले प्रकरणं तांत्रिक समितीकडे पाठविले जातात. तांत्रिक समितीमध्ये विमा कंपनीचे मुख्य वैद्यकीय अधिकारी व राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य वैद्यकीय सल्लागार मंजुरी देतात. त्यांच्या निर्णयामध्ये तफावत असल्यास अशा केसेस अंतिम मान्यतेसाठी विमा कंपनीचे क्षेत्रीय व्यवस्थापक यांच्याकडे पाठविण्यात येतात. ही प्रक्रिया २४ तासात पूर्ण होणे अपेक्षित आहे. इमर्जन्सी केसेसमध्ये रूग्णालयांद्वारे Emergency Telephonic Intimation (ETI) घेतले जाते. अशा केसेसमध्ये रुग्णांना वैध शिधापत्रिका ७२ तासाच्या आत सादर करणे आवश्यक असते. या सर्व सुविधा पाचोरा विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डॉ भूषण मगर डॉ सागर गरुड यांनी सर्वसामान्य नागरिक व गोरगरिबांसाठी केलेला प्रयत्न यानिमित्ताने यशस्वी होतांना दिसत आहे.

Add Comment

Protected Content