यावल येथे लालपरी वर्धापन दिनानिमित्त प्रवाशांचे स्वागत

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । यावल आगारात राज्य परिवहन महामंडळ लालपरीचा ७५व्या वर्धापन दिनानिमित्त एसटी कर्मचाऱ्यांनी प्रवाशांचे जल्लोषात स्वागत केले.

येथील आगारात राज्य परिवहन महामंडळाचा 75 वा वर्धापन दिन एसटी कर्मचाऱ्यांनी प्रवाशांच्या स्वागत सत्काराने केले, याप्रसंगी मोठया संख्येत प्रवाशांच्या सोबत एसटीचे अधिकारी व कर्मचारी यांनी उत्साहाच्या वातावरणात साजरा केला.

यावल बसस्थानकावर आयोजित कार्यक्रमाप्रसंगी एसटी आगाराचे व्यवस्थापक जी. पी. जंजाळ यांनी सर्वांच्या दळणवळणाचे प्रमुख साधन असलेल्या लालपरीच्या उत्पन्न वाढीसाठी कर्मचाऱ्यांनी कठोर परिश्रम घेण्याचे आवाहन करत प्रवासी हा आपले दैवत असल्याने त्यांचेशी नम्रतापूर्वक वागणूक देण्याचे आव्हान आपल्या सर्व चालक वाहक व कर्मचारी यांना केले. याप्रसंगी वाहतूक निरीक्षक पी. आर. वानखडे, सहाय्यक वाहतूक निरीक्षक संदीप अडकमोल, डी.बी.महाजन यांच्यासह आगारातील विविध पदांवर कार्यरत असलेल्या महीला कर्मचारी देखील प्रामुख्याने उपस्थित होत्या.

मागील काळातील कोरोना संसर्गाचे संकट आणि एसटी कर्मचारी यांचे राज्यव्यापी संप यामुळे विस्कळीत झालेली एसटी महामंडळाची यंत्रणा ही पुर्वपदावर येत आहे . संपानंतर एक ते सव्वा महीन्यापासुन पुनश्च सुरू झालेल्या एसटीकडे प्रवासी बांधव मोठया प्रमाणावर वढले असुन सुमारे ३ कोटी रूपये उत्पन्न प्राप्त झाल्याचे आगार व्यवस्थापक जी. पी. जंजाळ यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगीतले.

येथील आगारात एसटीच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्ताने आयोजित छोटेखानी कार्यक्रमात आगार व्यवस्थापक जी .पी. जंजाळ यांनी प्रवाशांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले याप्रसंगी जंजाळ यांनी एसटीचे दिवसेंदिवस वाढत असलेल्या उत्पन्नाचा दाखला देत कर्मचाऱ्यांनी असेच कठोर परिश्रम करावी असे आवाहन केले.

यावल एसटी आगाराचे दैनंदिन उत्पन्न हे साडेआठ लाखावर गेल्याचे सांगीतले. एसटी कर्मचाऱ्यांच्या सुमारे सहा महीन्यांपर्यंत चाललेल्या संपानंतर कर्मचाऱ्यांनी उत्पन्नवाढीसाठी कंबर कसली असुन येथील आगारात एकूण 62 बसेस असून येथील वीस चालक 135 वाहक आहेत 59 शेडूल द्वारे बसच्या एकुण  228 फेरी असून दैनंदिन चोवीस हजार किलोमीटर एसटी धावतात यात 18 बसेस या लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत त्यात सुरत, वापी, वडोदा ( गुजरात ), माहूरगड, कल्याण, पुणे , औरंगाबाद, अकोला, लातूर या लांब पल्ल्याच्या बसेसचा समावेश आहे सध्या येथील आगाराची दैनंदिन उत्पन्न साडेआठ लाखावर पोहोचली असल्याचे आगार प्रमुख जंजाळ यांनी सांगितले आहे. संपा पूर्वी एसटीचे उत्पन्न सात लाखावर होते. त्यात घवघवीत वाढ झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.

संपानंतर एसटीच्या संपूर्ण फेऱ्या या नियमीत व पूर्ववत सुरू झाले असून, १६ जुनपासुन शैक्षणिक सत्र सुरू झाल्यावर लवकरच शालेय बसेस सुरू करण्यात येणार असल्याचेही आगार व्यवस्थापक जी पी जंजाळ यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

 

Protected Content