फैजपूर प्रतिनिधी । वृक्ष लागवड सप्ताहाचे औचित्य साधून येथील डी. एन. कॉलेजीमधील तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी गुलाबाचे रोपटे देऊन स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या वेळी प्रा तायडे सर यांनी महाविद्यालयाचा ऐतिहासिक वारसा व विभागविषय माहिती दिली. वनस्पतीशास्त्र विषयाचे महत्व व नोकरीच्या संधी या विषयी डॉ. डी. ए. कुमावत यांनी मार्गदर्शन केले.या प्रसंगी विभाग प्रमुख डॉ डी ए कुमावत, प्रा. डी. आर. तायडे, डॉ. नितीन चौधरी, डॉ. जयश्री पाटील, डॉ सरला तडवी, प्रा. शिवाजी मगर, प्रा. शेख सर, प्रा शाहरुख सर व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. शिवाजी मगर यांनी केले. तर यशस्वीतेसाठी आर. आर. जोगी, संतोष तायडे यांनी सहकार्य केले.