Home Cities चोपडा वरगव्हाणला गुलाब पुष्पांनी विद्यार्थ्यांचे स्वागत

वरगव्हाणला गुलाब पुष्पांनी विद्यार्थ्यांचे स्वागत

0
41
vargavhan school

vargavhan school

धानोरा, ता. चोपडा प्रतिनिधी । येथून जवळच असणार्‍या वरगव्हाण येथील शाळेत पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

वरगव्हण गावात आज सकाळी मराठी शाळा सुरू झाली शाळेचा पहिला दिवस म्हणून आज गावात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यात पहिल्यांदा गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. यानंतर जिल्हा परिषद आरोग्य सभापती दिलीप पाटील, गट शिक्षण अधिकारी भावना भोसले व ग्रामस्थांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प व पुस्तके देऊन त्यांचा शाळेतील पहिला दिवस साजरा करण्यात आला.


Protected Content

Play sound