नववर्षाचे स्वागत करताय…मग जिल्हाधिकाऱ्यांचे नवीन निर्देश वाचा

जळगाव प्रतिनिधी । कोरोना आणि ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटच्या संसर्गाचा नवीन धोका लक्षात घेता, नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला काही प्रमाणावर निर्बंध लावण्यात आले आहे. या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.

 

जिल्हाधिकारी यांनी ३१ डिसेंबर आणि 1 जानेवारी रोजी नववर्षाच्या निमित्ताने काही मार्गदर्शक सूचना जारी केले आहेत.  कोरोना आणि ओमायक्रोन या नवीन विषाणू प्रजाती आढळून आल्याने संसर्गाचा नवीन धोका निर्माण होऊ नये, या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी म्हणून मोठ्या प्रमाणावर एकत्र न येता यावर्षी नवीन वर्षाचे स्वागत साध्या पद्धतीने करावे असे मार्गदर्शन सूचना काढण्यात आलेला आहे.

 

नागरिकांनी ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी रोजी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत शक्यतोवर घरीच करावे, राज्य शासनाने २५ डिसेंबर च्या आदेशान्वये जमाबंदीला मनाई राहणार असून याचे देखील पालन करावे. नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना बंदसभागृहात आसनक्षमतेच्या २५ टक्केच्या मर्यादित उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. या ठिकाणी कोणत्या प्रकारे गर्दी होणार नाही व सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे, मास्क व सॅनिटायझर वापर करावा याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.  ६० वर्षावरील नागरिकांनी व १० वर्षाखालील मुलांनी सुरक्षतेच्या व आरोग्याच्या दृष्टीने शक्यतोवर घराबाहेर पडणे टाळावे. ३१ डिसेंबरच्या दिवशी नागरिकांनी बागेत, रस्त्यात व सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने येऊन गर्दी न करता सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे. नववर्षाच्या स्वागताचा खर्चात निमित्ताने कोणत्याही धार्मिक व सांस्कृतीक कार्यक्रमांना मनाई करण्यात आलेले आहे. धार्मिकस्थळी जात असताना करण्याचे नियम पालन करावे. फटाके फोडण्यास मनाई असून याचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे.  दिलेल्या सूचनांचे पालन न केल्यास संबंधित व्यक्तीवर आपत्ती व्यवस्थापन कायदा अंतर्गत कारवाई करण्यात येईल, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अभिजित राऊत यांनी आज निर्गमित केलेले आहे.

Protected Content