यावल प्रतिनिधी । तालुक्यातील मनवेल गावात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून संततधार पाऊस झाल्याने गावातील बस स्थानक परिसरात पुर्णपणे चिखलमय झाले असून येथे भरणारा आठवडे बाजारात घाणीचे प्रचंड साम्राज्य पसरले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आठवडे बाजारातील पारिसरात सर्वत्र चिखल झाले असल्याने या चिखलातच भाजीपाला व आदी जीवनावाशक वस्तु विक्री होत असून खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना चिखलामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. बाजारात मोठ्या प्रमाणात सर्वत्र चिखल असल्यामुळे शेतकरी बांधव व बाहेरगावाहून येणाऱ्या व्यापा-यांना बाजारात आपली दुकाने लावण्याची मोठी पंचाईत झाली आहे. या गावामध्ये गेल्या 5 वर्षापासुन आठवडे बाजार सुरु आहे. या बाजाराला परीसरातील व्यापारी व शेतकरी बांधवांकडुन चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे बाजार टिकुन आहे. मात्र या पावसाळ्यात ग्रामस्थांना सुविधाचे अभाव असल्याचे जाणवत असल्यामुळे बाजारात जिवनावश्क वस्तु विक्रेत्यांमध्ये या गैरसोयीमुळे नाराजी दिसुन येत आहे.
आठवडे बाजार सायंकाळी 5 वाजेपासून चांगला भरत असुन रात्रीच्या वेळी गावठाण परीसर असुनही विजेची सुविधा नाही तर बाजारात सर्वत्र चिखल मोठ्या प्रमाणात असुन रेतीचा भराव करण्याची मागणी होत आहे. गावठाण परीसरात आठवडा बाजार भरत असुन येथे महिला व पुरुषांना स्वच्छतागृह नसल्यामुळे मोठी अडचण निर्माण होत आहे. बाजाराला चांगला प्रतिसाद मिळत असतांना देखील ग्राम पंचायत प्रशासना कडुन मिळणाऱ्या सुविधांचा अभाव जाणवत आहे. या सर्व प्रकारामुळे येथील बसस्थानक परीसरातील रहीवाशी ग्रामस्थ चांगलेच त्रस्त झाले आहे. या सर्व समस्यांकडे मनवेल ग्राम पंचायत प्रशासन लक्ष देईल अशी अपेक्षा शेतकरी, व्यापारी ग्रामस्थ व्यक्त करीत आहे.