मुंबई प्रतिनिधी । राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी आता राष्ट्रपती राजवटीमुळे निवांतपणे विचार करता येईल असे वक्तव्य शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केले.
काँग्रेसचे नेते अहमद पटेल आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यात ते म्हणाले की, सरकार स्थापनेबाबत शिवसेनेने पहिल्यांदा कालच आम्हा दोन्ही पक्षांशी संपर्क साधला. या अनुषंगाने सरकार स्थापन करायचे असेल तर पहिल्यांदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चर्चा होईल. यानंतर सत्ता स्थापन करण्याचे ठरल्यास शिवसेनेशी चर्चा करण्यात येईल असे ते म्हणाले. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रपती राजवटीमुळे आम्हाला चर्चा करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाल्याने यावर आता निवांतपणे विचार करू. पवार यांच्या या वक्तव्याने सत्ता स्थापन करण्याचा तिढा लवकरच सुटणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.