जे गेले त्यांना आम्ही परत घेणार नाही; उद्धव ठाकरे, शरद पवार यांची स्पष्ट भूमिका

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशामुळे आघाडीतील नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा पक्षातून गेलेल्यांना पुन्हा पक्षात घेण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. जे गेले त्यांना आम्ही परत घेणार नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. तर गेलेल्या लोकांना परत घेण्याचा प्रश्नच येत नसल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांनी व्यक्त केलेल्या या मतांमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे परतीचे दोन कापले गेले असल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांचा प्रश्न देखील गंभीर होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला अपेक्षेपेक्षा जास्त चांगला विजय मिळाला आहे. तर दुसरीकडे महायुतीचा दारुण पराभव झाला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने आता विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. त्या संदर्भातील मविआची प्राथमिक बैठक आज मुंबईत पार पडली. या बैठकीनंतर महाविकास आघाडीची महत्त्वाची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत गेलेल्या नेत्यांना पुन्हा पक्षात घेणार का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांनी उत्तर दिले आहे. त्यांना परत घेण्याचा प्रश्नच नसल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकीत आमच्यासोबत राहिलेल्या आणि संघर्ष करणाऱ्या सर्वांना सोबत घेऊन आम्ही पुढे जाणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. इतकेच नाही विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याचा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. आमच्यात कोणीही छोटा भाऊ किंवा मोठा भाऊ नाही. तर सर्वांना एकत्र घेत निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे ठाकरे यांनी म्हटले आहे.

Protected Content