जळगाव, प्रतिनिधी | संकुल क्रीडांगण पाऊस झाल्यावर सुद्धा उपयोगात येईल अशी व्यवस्था करू असे प्रतिपादन मिलिंद दीक्षित यांनी केले. ते जिल्हा क्रीडा अधिकारी पदाचा कार्यभार सांभाळल्यावर हॉकी जळगाव संघटने तर्फे आयोजित स्वागत समारंभात बोलत होते.
नेहरू चषक हॉकी स्पर्धा या दोन दिवसा पासून पाऊसा मूळे रद्द होत होत्या व मंगळवारी सुद्धा खेळ न होता सर्व शाळा व आयोजन समिती च्या निर्णया नुसार पेनल्टी स्ट्रोक करून सामने घेण्यात आल्याने हॉकी जळगावचे सचिव फारूक शेख यांनी नवीन क्रीडा अधिकाऱ्यांच्या स्वागत समारंभात सदर खंत व्यक्त केली होती.दीक्षित यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना निश्चितच अशी व्यवस्था करू की पाऊस आल्यावर काही वेळा नंतर क्रीडांगळावर खेळ होऊ शकेल तसेच अस्ट्रो टर्फ चा सुद्धा प्रस्ताव सादर करू असे त्यांनी संघटनेला व खेळाडूंना आश्वासित केले. हॉकी जळगावतर्फे सचिव फारूक शेख यांनी शाल,श्रीफळ व पुष्प गुच्छ देऊन सत्कार केला. सहसचिव प्रो. डॉ. अनिता कोल्हे यांनी त्यांचा परिचय सादर केला. फुटबॉल असो चे अब्दुल मोहसीन,हॉकी संघटनेचे लियाकतअली , संकुल चे हॉकी प्रशिक्षक अरविंद खांडेकर व खेळाडू यांनी सुद्धा पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले.सूत्र संचालन अरविंद खांडेकर यांनी केले तर आभार राष्ट्रीय खेळाडू मोहम्मद आबिद यांनी मानले.