Home राजकीय दह्शतवादाशी लढण्यात पाकिस्तानची मदत करण्यास तयार – राजनाथ सिंग

दह्शतवादाशी लढण्यात पाकिस्तानची मदत करण्यास तयार – राजनाथ सिंग


rajnathsingh on pakistanpic

चंदौली (वृत्तसंस्था)। केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे की, पाकिस्तानमध्ये दहशतद्यांना संपवण्याची क्षमता नसेल तर त्यांनी भारताकडून मदत घ्यायला हवी. त्यांना हवी ती मदत केली जाईल. आम्ही दहशतवाद नष्ट करू’ असे आवाहन त्यांनी केले आहे. ‘दहशतवाद नष्ट करण्यासाठी भारत पाकिस्तानची मदत करण्यास तयार आहे. दहशतवाद्यांविरोधात निर्णायक युद्ध व्हायला हवे. पाकिस्तानमधील दहशतवादाचा समूळ नाश करायला हवा, यासाठी आमच्या सरकारने तयारी केली आहे’ असे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.

जगभरातले अनेक देश दहशतवादाशी लढत आहेत. भारताने दहशतवाद्यांना नष्ट करण्यासाठी पावले उचलली आहेत. या कामात भारताला जगभरातील अनेक देशांकडून समर्थन मिळत आहे. या कामात जगभरातील अनेक देश भारताच्या पाठिशी उभे आहेत. जर पाकिस्तानने दहशतवाद्यांविरोधात पावले उचलली, तर भारत पाकिस्तानाला सहकार्य करेल असंही त्यांनी म्हटले आहे. उत्तर प्रदेशमधील चंदौली येथे शनिवारी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound