फैजपूर, ता. यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील वीज पुरवठा वारंवार खंडीत होणे व नगरपरिषद चा शहरातील पाणी पुरवठा रोजच विस्कळीत होत असल्याने आ. शिरीष दादा चौधरी यांनी महावितरणच्या कार्यालयात बैठक आयोजित करत सुरळीत वीज पुरवठ्याचे निर्देश दिलेत.
गेल्या चार महिन्यांपासून फैजपूर शहरातील आसाराम नगर (राजबाग) फिडर वर दररोज वीज पुरवठा दिवसातुन किमान चार वेळा खंडित होत असल्याने घरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणे तसेच विजेवर कामे करणारे उद्योग धंदे मजूर वर्गावर परिणाम होत आहे. तसेच, फैजपूर नगरपरिषद च्या पाणी पुरवठा विभागावर सुद्धा लोहारा येथे पाणी उचल व फैजपूर फिल्टर प्लांट या दोन्ही ठिकाणी वारंवार वीज पुरवठा बंद होत असल्याने परिणाम होत आहे.
या दोन्ही कामासाठी माजी उपनगराध्यक्ष केतन किरंगे यांनी आ. शिरीष दादा चौधरी यांना सांगितले त्यानुसार आमदार शिरीष चौधरी यांनी वीज मंडळाचे गोरक्षनाथ सपकाळे यांची बैठक घेऊन मार्ग काढायला सांगितले यापुढे नगरपरिषद च्या पाणी पुरवठा वर व आसाराम नगर (राजबाग) फिडर वर परिणाम होऊ देणार नाही असे आश्वासन सपकाळे यांनी दिले.
याप्रसंगी धनंजय चौधरी, केतन किरंगे, पत्रकार अरुण होले तसेच वीज मंडळाचे फैजपूर येथील उप अभियंता सरोदे, फैजपूर विभागाचे पाटील, लोहारा वीज केंद्राचे कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.