‘मेरी मिट्टी-मेरा देश’ अभियानास उत्स्फुर्त प्रतिसाद

रावेर-लाईव्ह ट्रेंडस नयूज प्रतिनिधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या मेरी मिट्टी-मेरा देश अभियानास रावेर लोकसभा क्षेत्रात अतिशय उत्तम असा प्रतिसाद लाभला.

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या सूचनेनुसार आजादी का अमृत महोत्सव मेरी मिट्टी-मेरा देश मिट्टी. . हे अभियान भाजपचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे राबविण्यात आले. देशासाठी अनेकांनी सर्वोच्च त्याग केला आहे वैयक्तिक सुखदुःखाची परवा न करता स्वातंत्र्यासाठी लढा देणार्‍या अशा शूर वीरांना जन्म देणारी आपली भारतमाता खरंच महान आहे, अशा महान भूमीत आपण जन्मलो हे आपले भाग्यच या भारत मातेसाठी आणि येथील जनतेसाठी आपली ही काही कर्तव्य आहे. याचीत कृतज्ञता उराशी बाळगत पंतप्रधान मोदी यांनी मेरी मिट्टी-मेरा देश हे अभियान जाहीर केले होते.

दरम्यान, या अनुषंगाने रावेर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षातर्फे प्रत्येक खेडेगावात, पंचायत समितीच्या स्तरावर जिल्हा परिषदेच्या गट स्तरावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या अभियानांतर्गत आपल्या स्थानिक ठिकाणी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलेल्या वीर जवानांच्या नावाचे फलक उभारून त्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले, त्याचबरोबर माती हातात घेऊन देशासाठी स्वतःला समर्थक करण्याची शपथ घेण्यात आली. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ७५ वृक्षारोपण करण्यात आले.

त्याचबरोबर यामध्ये हयात असलेल्या आणि नसलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान करण्यात आला आणि लष्करी दलांमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांचाही तसेच निवृत्त पोलीस कर्मचार्‍यांचाही सन्मान करण्यात आला. या अभियानासाठी जळगाव पूर्व जिल्हातील ९ मंडळातील ५५००० जनतेने सहभाग नोंदविले. जिल्ह्यातील स्थानिक ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन, खासदार रक्षाताई खडसे,आमदार संजय सावकारे, चंद्रकांत बाविस्कर, राजन लासुरकर, उमेश फेगडे, प्रफुल जवरे, प्रभाकर पाटील, भालचंद्र पाटील, परीक्षित बराटे, पंकज पाटील, गजेंद्र जयस्वाल अशा प्रमुख लोकांच्या उपस्थितीत स्थानिक ठिकाणी मेरी मिट्टी मेरा देश या अभियानाचे आयोजन करण्यात आले असून हे अभियान यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्यांनी व जनतेनी सहभाग नोंदवला असून जळगाव पूर्व चे युवा जिल्हाध्यक्ष अमोलदादा जावळे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले आहे. या संदर्भातील निवेदन भाजपचे जिल्हा कार्यालय मंत्री गणेश माळी यांनी जारी केले आहे.

Protected Content