रावेर, प्रतिनिधी । तालुक्यातील सात गावांचा संभाव्य पाणीटंचाईचा प्रस्ताव जिल्हा परीषदला पाठवण्यात आला आहे. या गावांना एप्रिलच्यापुढे पाण्याची टंचाई जावण्याची शक्यता आहे.
रावेर तालुक्यातील मोरगांव, निंभोरासिम, तिड्या, मोहमांडली, मांगी, लालमाती, थोरगव्हाण या गावांना एप्रिलच्यापुढे संभाव्य पाणी पाणीटंचाईचा प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव रावेर पंचायत समितीने जिल्हा परिषद जळगाव यांच्याकडे पाठवला आहे. यामध्ये बोरवेल व विहीर अधिग्रहण करण्याचा आराखड्यात घेतले आहे.