नाशिकमध्ये पाणीबाणी; गंगापूर धरणाचे तळ गाठल्याने समस्या वाढल्या

नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आपल्या मुबलक पाणीसाठयामुळे प्रसिध्द असलेला नाशिक शहर सध्या पाण्याच्या समस्येला समोरा जात आहे. नाशीकमधील पंचवटीतील टकलेनगर, कृष्णनगर, गणेशवाडी, सहजीवननगर, दातेनगरसह म्हसरूळ परिसरातील बोरगड, किशोर सूर्यवंशी मार्ग, पुष्पकनगर या परिसरातील नागरिक विद्युत मोटारी बंद होताच पाणीपूरवठा होत नाही, अशी खंत व्यक्त करत आहे. ज्याच्याकडे विद्युत मोटारी नाही त्यांना पाण्यासाठी पंधरा-वीस मिनिटे वाट पाहवी लागत आहे.

गंगापूर धरणाने तळ गाठल्याने भविष्यात नाशिकला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपलब्ध पाणी सर्वांनी जपून वापरण्याची अपेक्षा आहे. परंतु याही स्थितीत अनेक ठिकाणी चक्क नळी लावून सडा टाकला जात आहे. महापालिकेच्या पाणीपुवरठा विभागाने याबाबत अधिक दक्ष राहून पाण्याचा अपव्यय करणारांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करत आहे. शहराच्या गावठाण भागात दिवसातून दोन वेळेस पाणीपुरवठा होतो. दुपारी अतिशय अल्प दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने महिलांना पाणी भरण्यासाठी भल्या पहाटे उठावे लागते.

 

Protected Content