जळगाव, प्रतिनिधी । महापालिकेची गिरणा नदी पात्राजवळ सुमारे आठ एकर जागा आहे. तेथे यापूर्वी रॉ वॉटर स्टेशन व जलशुद्धीकरण केंद्र होते. मात्र, हे केंद्र बंद पडले असून, या ठिकाणी वॉटर पार्कसह पर्यटनस्थळ विकसित करण्यासाठी पर्यटन विकास मंत्रालयाकडून हिरवा कंदील मिळाला आहे. त्यानुसार शनिवार २० जुलैपासून या जागेची मोजमाप करून विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू होणार आहे. महिन्याभरात प्रस्ताव तयार करून तो शासनाकडे पाठविला जाणार आहे.
शहराला सावखेला शिवारातील गिरणा पंपिग पाणीपुरवठा केला जायचा. कालातंराने आता वाघूर धरणातून पाणीपुरठा करण्यास प्रारंभ झाला आहे. . ही जागा हे सावखेडा शिवारात गिरणा नदी पात्रालगत असून, पाण्याचे स्रोत अत्यंत जवळच आहे. यामुळे बंद पडलेले रॉ वाटॅर स्टेशन व जलशुद्धीकरण केंद्र, सावखेडा येथील संपूर्ण जागा तेथील भंगार अवस्थेत पडलेली पंपिंग स्टेशनची जुनी मशिनरी आहे. या जुन्या मशिनरीचा लिलाव करून आता या जागेवर पर्यटनस्थळ विकसित करण्यासाठी स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी पर्यटन मंत्री जयकुमार रावळ यांची प्रत्यक्ष भेट घेवून हा प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावाला ना. रावळ यांनी सकारत्मकता दर्शवून त्वरीत विकास आराखडा तयार करून देण्याचे सूचित करत या पर्यटन स्थळाला निधी उपलब्ध करण्याचे आश्वास दिले आहे. यानुसार आज स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे, शहर अभियंता सुनील भोळे, पाणी पुरवठा अभियंता डी. एस. खडके व विकास आराखडा तयार करून देणारे वास्तुविशारद किशोर पाटील यांनी या वाघुर पंपीगची पाहणी केली.
विकास आराखडा लवकरच
महापालिकेच्या बांधकाम विभागामार्फत “वॉटर पार्क’ व पर्यटन स्थळ तयार करण्यासाठी वास्तुविशारद म्हणून किशोर पाटील यांची नेमणूक केली आहे. महिन्याभरात विकास आराखडा, थ्रीडी प्रोजेक्ट, तसेच पॉवर पॉईंट प्रेझंटेशन तयार करून तो जिल्हाधिकाऱ्यांना देवून जिल्हाधिकारी शासनाकडे पाठविणार आहेत. गिरणा नदीपात्राजवळील पाणी उचल (रॉ वॉटर) स्टेशनची जागा ४ एकर तर जवळच असलेल्या चार ते पाच एकरमध्ये असलेले जलशुध्दीकरण केंद्राच्या ठिकाणी अद्यावत असे “वॉटर पार्क’ तयार केले जाणार आहे. यात वॉटर डायव्हींग, वॉटर फॉल, रेन डान्सींग वॉटर, म्युजीक वॉटर तसेच नदी पात्रात बंधारा टाकून तेथे बोटींग, विश्रामगृहाची सुविधा केली जाणार आहे.