भुसावळ प्रतिनिधी । तापी नदीच्या कोरड्या पडलेल्या पात्रात हतनूरमधून आवर्तन सुटल्यामुळे पाणी आले असून यामुळे भुसावळकरांसह रेल्वे प्रशासनाला काही दिवस तरी दिलासा मिळणार आहे.
याबाबत वृत्त असे की, गत वर्षाच्या अल्प पावसामुळे भुसावळात अक्षरश: हाहाकार उडाला आहे. तापी नदीपात्र कोरडेठाक पडले आले. इतिहासात कधीही नव्हती इतकी भीषण पाणी टंचाई असल्याने नागरिक अक्षरश: हैराण झाले आहेत. तर तापीच्याच पाण्यावर अवलंबून असणार्या रेल्वे प्रशासनाच्याही तोंडचे पाणी उडाले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे तापीच्या वरील भागात असणार्या हतनूर प्रकल्पातही अल्प पाणीसाठा असल्यामुळे आवर्तन सोडण्यात अडचणी आहेत. याआधी एकदा आवर्तन सोडल्याने काही दिवसांपुरता पाणी प्रश्न सुटला होता. यानंतर आता पुन्हा एकदा हतनूरचे आवर्तन सोडण्यात आल्यामुळे आता तापी खळाळून वाहू लागली आहे. तापीवरील सर्व बंधारे आता ओसंडून वाहू लागले आहेत. यामुळे काही दिवसांपर्यंत तरी शहरवासियांसह रेल्वे प्रशासनाला सुटकेचा श्वास टाकता येणार आहे. तथापि, यानंतर पुन्हा आवर्तन न मिळाल्यास तापी नदी पात्र परत एकदा कोरडे पडणार असल्याचेही निश्चीत झाले आहे.
पहा : हतनूरच्या आवर्तनाने तापी नदी पात्रात आलेले पाणी.