बलबलकाशी नाल्यातील पाण्यावर फुलवली बाग; फिल्टरचे लोकार्पण

filter unit bhusawal

भुसावळ प्रतिनिधी । येथील प्रोफेसर कॉलनीत बलबलकाशी नाल्यावरील पाण्यावर बाग फुलविण्यात आली असून याच्या फिल्टरचे लोकार्पण करण्यात आले.

आमदार संजय सावकारे यांच्या संकल्पनेतून प्रोफेसर कॉलनी येथे संजनी पार्क उभारण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणवीस यांच्या हस्ते व आमदार संजय सावकारे यांच्या पुढाकाराने संजनी पार्क चे लोकार्पण ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले होते. उन्हाळ्याची चाहूल लागताच संजनी पार्क च्या बोरिंग आटू लागल्या व पार्क मधील झाडे जगवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले होते. यावर तोडगा काढत पार्क शेजारून जाणार्‍या बलबलकाशी नाल्यातील पाण्याचा वापर आपण झाडे जगवण्या साठी करू शकतो ही संकल्पना आमदार सावकारे यांच्या मनात आली.

यानुसार नाल्यातील पाणीच्या शुद्धीकरणा साठी सेंड फिल्टर व कार्बन फिल्टर असे दोन फिल्टर लावण्यात आले. तसेच नाल्याच्या पाणीच्या शुद्धीकरणा ला आवश्यक असे सर्व उपकरण मागील दोन महिन्या पूर्वी लावण्यात आले, मागील दोन महिन्या पासून बगीच्या मधील झाडांना नाल्यातील फिल्टर झालेले हेच पाणी देण्यात आले. याद्वारे बगीच्या मधील झाडे वाचवण्यात अपेक्षित यश आले.हा प्रयोग यशस्वी झाल्यावर फिल्टरचे लोकार्पण जागतिक पर्यावरणदिनाच्या निमित्ताने आ. संजय सावकारे यांच्या हस्ते करण्यात आले.

आपल्या मनोगतात आमदार संजय सावकारे यांनी पाण्याचे व झाडांचे महत्व सांगितले व प्रयोग यशस्वी झाल्या बद्दल आनंद व्यक्त केला. हा उपक्रम सार्वजनिक ठिकाणी करण्यात आला परंतु जर असे उपक्रम सर्वांनी आपल्या घरातील सांडपाण्याचा वापर करून वृक्ष लागवड करावी. अथवा टेरेस गार्डन साठी वापरावे,पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरा असे सांगितले. या उपक्रमात परिसरातील नागरिकांचा सहभाग मोलाचा आहे व त्यांचा सहकार्या बद्दल नागरिकांचे कौतुक करत जेव्हा शासन व प्रशासन ला लोकसहकार्य लाभत तेव्हा नेहमी चांगले कार्य होतात असे सांगितले.

या कार्यक्रमात प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ रजनी सावकारे, किशोरभाऊ पाटील,अजित चौधरी,अनिल चौधरी,सुनील शुक्ला, सोपान खडसे,मुरलीधर टेकाळे,भरत पिंपळे,एल.पी.पाटील,मंगललक्ष्मण भदाणे,श्रध्दा चौधरी,सरला सावकारे, अनिता आंबेकर,सपना जंगले,लीना टेकाळे, मीनाक्षी पिंपळे,वैशाली भदाणे, अर्चना सोनवणे,मनीषा काकडे, सुनंदा भारुळे,मंगला पाटील, आभा दरगड, युवराज पाटील,रवींद्र पाटील,दीपक बाविस्कर, लल्ला चांदणे आदी उपस्थीत होते.

Add Comment

Protected Content