औष्णीक विद्युत केंद्रातील जखमीची प्रकृती धोक्याबाहेर

भुसावळ प्रतिनिधी । दीपनगर येथील औष्णीक विद्युत केंद्रात काम करतांना काल जखमी झालेले सचिन शिंदे यांची प्रकृती धोक्याबाहेर असून युनिटमध्ये काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त सोबतच्या लिंकवर क्लिक करून वाचा

काल झालेल्या दुर्घटनेच्या संदर्भात आज मुख्य अभियंत्यांनी एका निवेदनाच्या माध्यमातून माहिती दिली आहे. यानुसार, दीपनगर येथील औष्णिक विद्युत केंद्र येथे काल दि २२ सप्टेंबर रोजी दुपारी पावणेचार वाजा संच क्र ५ च्या राख हाताळणी विभागातील इएसपी एल टी पॅनेल रूममधील एल टी ( लो टेन्शन) स्पेअर ब्रेकर काढतांना फ्लॅश ओव्हर होऊन एक अपघात झाला. या प्रसंगी तिथे कार्यरत असलेले महानिर्मितीचे कर्मचारी सचिन शिंदे तंत्रज्ञ- ३ यांना काही प्रमाणात इजा पोहोचली. यात अन्य कुणासही इजा झालेली नाही. कर्मचारी शिंदे यांच्या अंगावर गरम राख पडलेली नसून केवळ फ्लॅश ओव्हर मुळे श्री शिंदे यांच्या हातास आणि चेहर्‍यावर भाजल्याच्या जखमा झाल्या आहेत. स्थानिक प्रशासनाने तातडीने वैद्यकीय उपचाराची तजवीज केल्याने आता त्यांची प्रकृती चांगली आणि स्थिर आहे. सध्या त्यांच्यावर जळगाव येथील आर्किड हॉस्पिटलला उपचार सुरू आहेत.

यात पुढे म्हटले आहे की, संबंधीत उपघाताचा अहवाल कारखाना निरीक्षक जळगाव यांनादेखील पाठविण्यात आलेला आहे.तसेच अशा प्रकारचे अपघात टाळण्यासाठी यापुढे अधिक दक्षता बाळगण्याचे व त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे निर्देश मुख्य अभियंता राजू घुगे यांनी सर्व संबंधितांना दिले आहेत.

Protected Content