मुक्ताईनगर तालुक्यात जलसंवर्धनासाठी जनजागृती मोहीम

मुक्ताईनगर प्रतिनिधी । तालुक्यातील टाकळी येथील रामदेव बाबा बहुउद्देशीय संस्था व सुकळी येथील नवीन माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जलसंवर्धनासाठी जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली असून याला प्रतिसाद लाभत आहे.

गत अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू असल्याने मुक्ताईनगर तालुक्यात २०१६साली ७१३ मिलिमीटर २०१७ साली ५३७ किलोमीटर तर २०१८साली ३५७ मिलिमीटर पर्जन्यमान झाले आहे. अर्थात दरवर्षी दोनशे मिलिमीटर पावसाचे प्रमाण कमी होत आहे ही बाब तालुक्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. भूजल पातळीतही घट होत असून यासाठी वेळीच जागे होण्याची आवश्यकता आहे. यासाठी जनजागृती करण्याचे काम तालुक्यातील टाकळी येथील रामदेव बाबा बहुउद्देशीय संस्था व सुकळी येथील नवीन माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त संकल्पनेतून करण्यात येत आहे. ही संकल्पना संस्थेचे सचिव डॉक्टर दिलीप पानपाटील यांनी सुचवल्यामुळे सुकळी येथील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रदीप दाणे उपशिक्षक दत्तात्रय फेगडे, शरद बोदडे, शरद चौधरी, श्रीमती वैशाली सोनवणे, राजेंद्र वाघ, विशाल काकडे, मंगेश दांडगे, संदीप पावरा, मयूर सपकाळे यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी नवल कोळी, सतीश सोनवणे, अनिल चौधरी यांनी यात मोहिमेत सहभाग घेतला आहे. ते प्रत्यक्ष घरापर्यंत पोहोचून भेटी घेत आहेत व त्यांना पाण्याचे महत्त्व व बचत याबाबत मोलाचे मार्गदर्शन करीत आहेत. त्याचप्रमाणे येणारे जलसंकट किती भयावह आहे याचीही जाणीव करून देत आहेत.

या अभियानाची सुरुवात मुक्ताईनगर तालुक्यातील वायला या गावापासून करण्यात आली असून त्यानंतर महालखेडा, टाकळी, नांदवेल, डोलारखेडा, सुकळी, सोमनगाव आणि दुई अशा गावांमध्ये संदेश पोहोचविण्यात आला आहे या उपक्रमाचे तालुका भरातून कौतुक केले जात आहे आणि असे उपक्रम शासनाने हाती घ्यावेत अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे. या मोहिमेत वायला येथे पोलीस पाटील सुनील तायडे बाजीराव कोळी यांचेसह नागरिकांनी सहभाग नोंदविला. नांदवेल येथे जि. प. सदस्य निलेश पाटील यांनी सपत्नीक या अभियानात सहभाग नोंदवला. तसेच पोलीस पाटील अनिल वाघ, मुरलीधर पाटील, गजानन सुरवाडे, नंदू वाघ, दीपक वाघ, जि. प. शिक्षक हिरोळे यांनीही सहभागी होऊन जल बचतीचा संदेश दिला.

महालखेडा येथे पोलीस पाटील राजू वाघ ग्रामपंचायत सरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य माजी सरपंच तसेच सेवानिवृत्त शिक्षक गुणवंतराव वाघ यांनी सहभाग नोंदवला. टाकळी येथे संस्थेचे संचालक रसाल भाऊ चव्हाण यांनीही सहभाग नोंदवला. सुकळी सोमनगाव येथे सरपंच श्रीमती कांताबाई पाटील तसेच पंचायत समिती सदस्य विकास समाधान पाटील पोलीस पाटील संदीप इंगळे, कडू महाराज, विनोद डापके भाऊलाल पाटील, माजी सरपंच बाजीराव सोनवणे, सुनीता कोळी, भगवान धनगर, देवानंद चव्हाण, वामन कोळी, रघुनाथ कोळी, निसर्ग कृषी केंद्राचे संचालक दादाराव पाटील, प्रफुल्ल पाटील, वीरेंद्र पाटील, मुख्याध्यापक गाजरे यांनीही मोलाचे सहकार्य केले.

सुकळी येथे वसंत तळेले सरपंच, संदीप जावळे माजी सरपंच, जुलाल पाटील, राजेंद्र पाटील मुरलीधर फेगडे यांच्यासह मुख्याध्यापक ई. ओ. पाटील यांनीही अभियानात सहभाग नोंदवला. डोलारखेडा येथे पोलीस पाटील तसेच ग्रामस्थ सुरेश इंगळे विनोद इंगळे माजी सरपंच पुंडलिक वालखड , माणिक सोनार तसेच समाधान थाटे मारुती कोळी यांनीही मोलाचे सहकार्य केले.

Add Comment

Protected Content