भुसावळात रेल्वेच्या कचरा डेपोला आग ( व्हिडीओ )

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील रेल्वे यार्डातील कचरा डेपोला रात्री अचानक आग लागल्याची घटना घडली असून यात सुदैवाने हानी टळली.

याबाबत वृत्त असे की, रेल्वे स्थानकाच्या पुढे असणार्‍या गुडस् व कंटेनर शेडच्या परिसरात कचरा डेपो आहे. या डेपोला रात्री अकरा वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. आगीच्या ज्वाळा दिसल्यावर रेल्वे प्रशासनाने तातडीने यावर नियंत्ररासाठी हालचाली सुरू केल्या. भुसावळ आयुध निर्माणीतून तातडीने अग्निशमन पथकाला पाचारण करण्यात आले. या पथकासह रेल्वेच्या कर्मचार्‍यांनी आगीवर नियंत्रण मिळवल्यामुळे यात जास्त हानी झाली नाही. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण मात्र समजू शकले नाही.

एस. एस. पवार, ए.के. डेरे, एन.ए. दादुलकर आणि अंगद या अधिकार्‍यांसह भूषण पाटिल, दिलीप कोल्हे, राजेश बनसोडे, परेश सोनवणे, अनवर खान, महेंद्र सपकाळे आदी आयओएच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्यास मदत केली. तर भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरी अग्निशामक दलाच्या आर.एस. तडवी, एम. डी. सोनवणे, व्ही. डी. चौधरी यांनी आग विझवण्यात मोलाची भूमिका पार पाडली. याप्रसंगी रेल्वे सुरक्षा बलाचे यार्ड प्रमुख देवचंद यादव व सहायक फौजदार समाधान वाहूळकर हेदेखील घटनास्थळी उपस्थित होते.

पहा : भुसावळ रेल्वेच्या कचरा डेपोला लागलेल्या आगीचा व्हिडीओ.

Add Comment

Protected Content