मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | केंद्र सरकारच्या शिक्षण विभागाने खासगी क्लासेससंदर्भात जारी केलेल्या अध्यादेशातील काही तरतुदींविराेधात क्लासचालकांनी एल्गार पुकारला आहे. या तरतुदींविराेधात आंदोलन व न्यायालयीन लढा देण्याचा इशाराही क्लासचालकांनी घेतला आहे.
क्लासचालकांची पुढच्याआठवड्यात शहरात राज्यस्तरीय बैठक हाेत असून यात आगामीधोरण निश्चित केले जाईल, अशीमाहिती कोचिंग क्लासेस संचालकसंघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे यांनीपत्रकार परिषदेत दिली. मुळे यांनीसांगितले की, शासनाकडेक्लासचालकांची कुठलीही नोंदकरून घेतली जात नाही. मगप्रस्तावित अध्यादेशात नोंदणी रद्दकरण्याचा मुद्दा गोंधळ निर्माण करणारा आहे. वयोमर्यादेसंदर्भात अटीमुळेही क्लासचालकांमध्येगोंधळ उडाला आहे. पत्रकारपरिषदेस सरचिटणीस सीए लोकेशपारख, राज्य प्रतिनिधी रवींद्र पाटील आदी उपस्थित हाेते.
- केंद्र किंवा राज्य शासनानेक्लासेससाठी नियमावली करावी.
- सक्षम अधिकारी नेमतानाक्लासेसची नोंदणी करावी.
- छोटे, मध्यम क्लासेससंचालकांचा विचार करावा.
- १६ वर्षांआतील विद्यार्थ्यांनाप्रवेश न देण्याचा मुद्दा स्पष्ट व्हावा.
- आसनव्यवस्थेबाबत नियमअवास्तव असल्याचा दावा.
- विद्यार्थी संख्या, शुल्कआकारणीचा उल्लेख नाही.