पहूर, ता . जामनेर ( वार्ताहर ) वाकडी ता. जामनेर येथील ग्रामपंचायत सदस्य विनोद चांदणे यांच्या खून प्रकरणी अटकेत असलेल्या सर्व सहाही आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ झाली आहे. सोमवारी त्यांना जळगांव जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते .
चांदणे यांच्या खून प्रकरणी महेंद्र शामलाल राजपूत , विनोद सुरेश देशमुख , नामदार गुलाब तडवी , शेखर वाणी यांना दोन दिवसांची तर योगेश श्रावण सोनार ( तळेगांव , ता . जामनेर) व प्रदीप परदेशी ( डांभूर्णी, ता .पाचोरा ) यांना चार दिवसांची कोठडी सुनावण्यात आली . दरम्यान न्यायवैदयक पथकाद्वारे खुनातील आरोपींची चौकशी सुरू असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकडे यांनी सांगीतले