वाघुर पाईपलाईन मेहरूणजवळ फुटली; लाखो लिटर पाण्याची नासाडी ( व्हिडीओ )

wagur pipeline

जळगाव प्रतिनिधी । जळगावकरांची जिवनदायी असणारी वाघुर धरणावरील पाईपलाईन पुन्हा फुटली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वाघुर पाईपलाईन फुटण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे नागरीकांवर  पिण्याचा पाण्याचे संकट ओढावले  आहे. शहरात गेल्या दहा महिन्यांपासून अमृत योजनेचे काम युध्दपातळीवर सुरू असतांना आज पुन्हा मेहरूणच्या स्मशानभूमीजवळ वाघूर धरणाची पाईपलाईन फुटली. या पाईपलाईनमधून लाखो लिटर पाणी वाया जात होते.

 

शहरात वाघूर धरणातून  पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख जलवाहिनीला मेहरुण परिसरात शुक्रवार ५ एप्रिल रोजी  मोठी गळती लागली. त्यात धरणाचा पाणी साठा २० टक्के असल्याने महापालिकेने पाणीपुरवठा तीन  दिवसाआडचे वेळापत्रक आज सोमवार ९  एप्रिलपासून सुरू करण्यात आले आहे. त्यात आज दुपारी पुन्हा मेहरूणमधील चाटे मळा येथे जलवाहिनी फुटल्याने  पुन्हा एक दिवस पाणीपुरवठा पुढे ढकलण्यात आला आहे.  पंधरा दिवसापासून शहरातील पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. त्यात ५ एप्रिल मेहरुण रस्त्यावरील घुगे-पाटील केरोसिन वर्कशॉपजवळ मोठी गळती लागली होती. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आला होता. एक दिवस पाणीपुरवठा होत नाही तोच धरणाताली पाणीसाठा कमी झाल्याने महापालिका प्रशानने  शहराचा पाणीपूरवठा दोन दिवसावरून तीन दिवसाआड करण्याचे नियोजन केले आले. नियोजीत वेळापत्रकानुसार आज शहरातील अनेक भागात पाणीपुरवठा करण्यात आला. परंतू, दुपारी २.३० च्या सुमारास पुन्हा मेहरूण परिसरातील चाटे मळा येथे १२०० मीमी व्यासाच्या  जलवाहिनीला गळती लागली.

दुरुस्तीला२४  तासाचा लागणार अवधी 
चाटे मळा येथे जलवाहिनीला गळती लागल्याने महापालिकेचे पाणी पुरवठा विभागाचे कर्मचाऱ्यांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेत या जलवाहिनीवरून होणारा  पाणीपुरवठा बंद केला. जलवाहिनी फुटल्याने नविन जलवाहिनी टाकली जाणार असल्याने या कामाला २४ तासाचा अवधी लागणार आहे. त्यामुळे शहराला होणारा पाणीपुरवठा पून्हा  एक दिवस पुढे ढकलंला आहे अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे अभियंता डी. एस. खडके यांनी दिली.

 

 

Add Comment

Protected Content