Home Uncategorized वाघळी येथे एकाने गळफास घेवून आत्महत्या

वाघळी येथे एकाने गळफास घेवून आत्महत्या


चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील वाघळी येथील ४५ वर्षीय व्यक्तीने आपल्या राहत्या घरात दोरी बांधून गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीस आली असून ग्रामीण पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दिलीप रामदास धनगर (वय- ४५ रा. वाघळी ता. चाळीसगाव) हे वरील ठिकाणी आपल्या परिवारासह वास्तव्यास आहेत. धनगर हे आपल्या राहत्या घरातील छताला दोरी बांधून त्याच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी ७ (वेळ निश्चित नाही) वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मयताचे कारण हे अध्याप स्पष्ट झालेले नसून गणेश जबरान जाने (रा. वाघळी ) यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पोना दत्तात्रय महाजन हे करीत आहेत.

 


Protected Content

Play sound