जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यामंदिर जळगाव येथे बालचिमुकल्यांच्या अभ्यास जत्रेचे आयोजन करण्यात आले.
अभ्यास जत्रेचे उद्घाटन खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे प्रशासक शशिकांत वडोदकर तसेच व. पु. होले शिक्षण शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक राणे व मुख्याध्यापिका धनश्री फालक यांच्या हस्ते करण्यात आले. सदर अभ्यास जत्रेमध्ये इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध विषयांवर आपल्या अभ्यासाचे प्रदर्शन केले. यामध्ये कथाकथन, कविता गायन, चवींची ओळख, अक्षरलेखन, शरीराचे अवयव, बाजाराची माहिती, चौदाखडी, जत्रेची माहिती, वाक्य लेखन, रंग, चित्रकला तसेच अंकांची माहिती विद्यार्थ्यांनी विविध चार्ट तसेच मॉडेल्सच्या मदतीने दिली.
सदर प्रदर्शन पाहण्यासाठी शाळेचे पालक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते. अभ्यास जत्रेचे आयोजन इयत्ता पहिलीचे शिक्षक कल्पना तायडे , दिपक पाटील तसेच चारुलता भारंबे यांनी केले तर सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.