चोपड़ा प्रतिनिधी । तालुक्यात वृंदावन प्रतिष्ठानच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी मा.आ.जगदीश वळवी म्हणाले की, आजची भौगोलिक परिस्थिती बघता भविष्यात मानव जाती टिकवायची असेल, जगवायची असेल तर वृक्ष संवर्धन, जल व्यवस्थापन ही काळाची गरज आहे. ‘जल है तो कल है’ हे उगाच म्हटलेले नाही. आमच्या पूर्वजांनी पाणी नदयामध्ये, विहिरीत पाहिले. तेच आम्ही टाकयांमधे, ड्रममध्ये बघतो आहेत. वृक्षलागवड, संगोपन, जल व्यवस्थापन केले नाही तर येणाऱ्या पिढीला नदया, विहिरी, चित्रात अन् पाणी फक्त भांडयात, ग्लासामध्येच बघावे लागेल. आधीच्या काळी 30 फुटावर विहिरीत पाणी असे, शंभर फुटावर ट्यूबवेलला पाणी लागे, आता विहिरी नाहिश्या झाल्या आहेत. हजार-पंधराशे फूटापर्यंत जामिनीला पाणी नाही, ही भयावह परिस्थिती मानव जातीसाठी धोकयाची घंटा आहे. त्यामुळे आजच जागृत होणे ही काळाची गरज असल्याचे आवाहन जगदीश वळवी यांनी उपस्थितांना केले आहे.
याप्रसंगी यावल रोड़वरील बडगुजर पेट्रोलपंप परिसरात माजी आ जगदीश वळवी यांच्या हस्ते विधीवत पूजन करुन प्रारंभी बेल या वृक्षाचे रोपण करण्यात येवून वृंदावन प्रतिष्ठानच्या संचालक मंडळाच्या हस्ते परिसरात लिंब, वड आदी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय स्वयंमसेवक संघाचे जिल्हा सहकार्यवाह राजेश पाटील, व्यापारी महामंडळाचे कार्याध्यक्ष सुशील टाटीया, बडगुजर पेट्रोल पंपाचे संचालक अनिल बडगुजर, वृंदावन प्रतिष्ठानचे अध्यक्ष नरेंद्र विसपुते, देना बैंकेचे रोखपाल जितेंद्र दीक्षित, राजेन्द्र नेवे, सोपान जाधव, सनी सचदेव, कांतिलाल सनेर, राजेंद्र जैन, राजेन्द्र स्वामी, सुनील महाजन, पत्रकार शाम जाधव, वाय.डी.पाटील, आझाद जैन, यशवंत पाटील आदी उपस्थितीत होते.