जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना कक्षाच्या वतीने गुरूवार ९ मे रोजी “तारीख तेरा, मतदान मेरा “ या मतदार जनजागृती उपक्रमांतर्गत मतदानाची शपथ घेण्यात आली.
जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा निवडणूक प्रचार प्रसार प्रमुख तथा जिल्हा समाजकल्याण आयुक्त योगेश पाटील यांनी ८ मे रोजी जळगाव जिल्हयातील महाविद्यालयांच्या प्राचार्यांची ऑनलाईन बैठक घेऊन “तारीख तेरा, मतदान मेरा” या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे आवाहन केले होते. त्या अनुषंगाने रासेयो कक्षाच्या वतीने गुरूवारी अनेक विद्यार्थ्यांना सहभागी करुन घेण्यात आले व त्यांना मतदानाची शपथ दिली. कुलसचिव डॉ.विनोद पाटील, रासेयो संचालक डॉ.सचिन नांद्रे यांच्यासह विभागीय समन्वयक डॉ.संजय पाटील, प्रा.योगेश पुरी, डॉ.गोपाल निंबाळकर, डॉ.बिजवस्नी यांच्यासह कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.