मतमोजणीच्या प्रक्रियेची माहिती देण्यासाठी उमेदवार व त्यांच्या प्रतिनीधींची बैठक

viting machine

जळगाव (प्रतिनिधी) लोकसभा निवडणूक २०१९ च्या जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघाची २३ मे रोजी होणाऱ्या मतमोजणीच्या प्रकियेची माहिती देण्यासाठी मतदार संघातील उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींची बैठक जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली
घेण्यात आली.

या बैठकीला अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, निवडणूक उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, मतदार संघातील उमेदवार, प्रतिनिधी उपस्थित होते. डॉ. ढाकणे यांनी उमेदवारांचे ओळखपत्र, सकाळी ६ वाजता उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींनी मतमोजणीच्या ठिकाणी उपस्थित राहणे, ७ वाजून ४५ मिनीटांनी स्टॉग रूम उघडणे, ८ वाजता पोस्टल बॅलेट पेपर मोजणी करणे याविषयी माहिती दिली. तसेच उमेदवार व प्रतिनिधींनी निवडणूक मतमोजणी ओळखपत्रासाठी २० मे पर्यंत फॉर्म भरून देणे, मतमोजणी नंतर उमेदवारांनी ३० दिवसांपर्यंत आपला निवडणूक खर्च सादर करणे, कुठल्याही उमेदवार तसेच त्यांच्या प्रतिनिधींना मतमोजणी केंद्रावर मोबाईल आणता येणार नाही अशा सुचना दिल्या. यावेळी निवडणूक शाखेतील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Add Comment

Protected Content