दोन दिवसाच्या चौकशीनंतर समिती नाशिकला रवाना

 

 

जळगाव, प्रतिनिधी । माजी मंत्री गिरीश महाजन यांनी जामनेर येथे जिल्हा परिषडेच्या मालकीच्या जागेवर बीओटी तत्वावर बांधण्यात आलेल्या शॉपिंगमध्ये कोट्यावधीचा घोटाळा केल्याचा आरोप  ॲड.विजय भास्कर पाटील यांनी केला होता. या आरोपांची चौकशी  करण्यासाठी तीन सदस्यीय गठीत करण्यात आलेली आहे. या समिती दोन दिवसाच्या चौकशीनंतर नाशिकला रवाना झाली आहे.

जामनेरच्या शॉपींग कॉप्लेक्सच्या घोटाळ्या प्रकरणी चौकशी समितीचे अध्यक्ष सहाय्यक आयुक्त सतिश सांगळे,तसेच राजन पाटील,सहाय्यक लेखा अधिकारी चंद्रकांत वानखेडे या तीन अधिकाऱ्यांची समिती गठीत करण्यात आलेली आहे.  तीन सदस्यांच्या समितीने आज व्हीसी रूममध्ये बसुन बांधकाम विभागाकडून जामनेरच्या शॉपींग कॉम्प्लेक्स बाबत झालेले ठराव,त्यांच्या संबधीत मंजुर करण्यात आलेली कागदपत्रे,जागेचे नकाशे,मुळ नस्त्या यासह सर्व संबधीत कागदपत्रांची पडताळणी सुरू केली आहे. बांधकाम विभागाकडून समितीने विविध कागदपत्रांची मागणी केली असुन ती माहीती देखील त्यांनी देण्यात आली. यावेळी बांधकाम विभागाचे प्रभारी अभियंता नंदु पवार,सामान्य प्रशासनचे कमलाकर रणदिवे हे देखील समिती सोबत होते. सायंकाळी ६ वाजेपर्यंत समिती जि.पत तळ ठोकून होती.पाच तास कागदपत्रे पडताळणी केल्यानंतर समिती समिती नाशिक ला रवाना झाली आहे.  दरम्यान,   समिती पुढील आठवड्यात जामनेर येथे भेट देणार असल्याचे देखील समजते. मात्र याबाबत समिती अध्यक्षांनी याबाबत अजून तरी सांगता येणार नाही. सगळ्याबाबी तपासल्या जातील व आठवडाभरानंतर देखील समिती येईल असे स्पष्ट केले.

 

Protected Content